नगर-औरंगाबाद महार्गावरी दोन तास वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 16:37 IST2020-11-22T16:36:04+5:302020-11-22T16:37:08+5:30
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे रविवार (दि.२२) रोजी सकाळी साडेअकरा वाजता वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

नगर-औरंगाबाद महार्गावरी दोन तास वाहतूक कोंडी
नेवासा फाटा : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे रविवार (दि.२२) रोजी सकाळी साडेअकरा वाजता वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.
वाहतुकीचे कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस वेळेवर हजर नसल्यामुळे येथील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी ही वाहतूक कोंडी हटविण्याचा प्रयत्न केला.
दिवाळी आणि भाऊबिज तसेच शाळा सुरु होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक रस्त्यावर सुरु झालेली आहे. या वेळेतच नेवासा फाटा येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हजर नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप वाहनधारकांसह व्यावसायिकांना सहन करावा लागला.
तब्बल दोन तास वाहतूक कोंडीने वाहनधारकांचा कर्णकर्कश हॉर्न, गाड्यांच्या आवाजाने व्यावसायिक हैराण झाले होते. मात्र वाहतूक जाम झाल्यावर एक ते दीड तासाने नेवासा फाटा येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.