पिंपळगाव माळवीत रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी; चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:51 IST2020-07-10T17:51:27+5:302020-07-10T17:51:39+5:30
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले. ७ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपळगाव माळवीत रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी; चार जण जखमी
अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले. ७ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दाखल फिर्यादीवरून एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन दशरथ गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय सुदाम गुंड, राजेंद्र सुदाम गुंड, विष्णू पांडुरंग गुंड, पांडूरंग भाऊसाहेब गुंड, सुमन पांडुरंग गुंड, वत्सला पांडुरंग गुंड, ज्योती विष्णू गुंड, माधुरी गुंड यांच्या विरोधात दंगा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मोहन यांच्यासह त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद विष्णू पांडुरंग गुंड यांनी दाखल केली असून विश्वनाथ मोहन गुंड, मोहन दशरथ गुंड, अजिंक्य विश्वनाथ गुंड, अमर बाळासाहेब गुंड, मिनाबाई साहेबराव गुंड व प्रियांका विश्वनाथ गुंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.