श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 16:52 IST2018-01-14T16:51:39+5:302018-01-14T16:52:32+5:30
संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी
श्रीरामपूर : संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सद्दाम हबीब शेख (वय ३५, रा. प्रभाग २) व शुभम पतंगे (वय ३३, रा. प्रभाग ७) ही मयतांची नावे आहेत. जुनानी (पूर्ण नाव माहीत नाही) हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेने खळबळ उडाली आहे.
रांजणखोलजवळ प्रभात उद्योग समुहानजीक ही घटना घडली. शनिवारी (दि. १३) रात्री दोन वाजेच्या सुमारास पल्सर मोटारसायकलवरून ममदापूरच्या दिशेने (एमएच १७ बीयू ७६२३) श्रीरामपूर शहराकडे येत असलेले हे तिघे तरुण रस्त्याच्या कडेला झाडावर आदळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा दाखल झाला. त्यांना साखर क ामगार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. मोटारसायकलचा चक्काचूर झाला. जखमी जुनानी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.