काल दोन बालकांना जन्म; आज आईचा मृत्यू; निंबळकची ती कोरोनाबाधित दगावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:15 IST2020-05-29T12:15:00+5:302020-05-29T12:15:36+5:30

 गुरुवारी दोन बालकांना जन्म देणा-या  निंबळक येथील त्या कोरोनाबाधित आईचा शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. 

Two babies born yesterday; Mother's death today; Nimbalakachi she coronadabhit dagavali | काल दोन बालकांना जन्म; आज आईचा मृत्यू; निंबळकची ती कोरोनाबाधित दगावली 

काल दोन बालकांना जन्म; आज आईचा मृत्यू; निंबळकची ती कोरोनाबाधित दगावली 

अहमदनगर  :  गुरुवारी दोन बालकांना जन्म देणा-या  निंबळक येथील त्या कोरोनाबाधित आईचा शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. 

 सदर महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. गुरुवारी  या माहिलेने दोन गोंडस बालकांना जन्म दिला. पाच दिवसांपूर्वी ही महिला चेंबूर (मुंबई ) येथून निंबळकला येत असताना त्रास होत असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी  तिचा स्त्राव घेतला असता तो पॉझिटिव्ह आला होता. सदर महिला गरोदर होती. गुरुवारी दुपारी अकरा वाजता एक मुलगा व एक मुलगी अशा दोन बालकांना तिने  जन्म दिला होता. मात्र शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. 

दरम्यान, सदर महिलेला प्रसुतीनंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाबाधीत असलेल्या या महिलेला न्यूमेटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले. ही महिला मुंबईहून निंबळक (ता.नगर) येथे आली होती. 
 

Web Title: Two babies born yesterday; Mother's death today; Nimbalakachi she coronadabhit dagavali