संगमनेरात दोन एटीएम फोडले : २१ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:40 IST2018-08-02T12:40:40+5:302018-08-02T12:40:45+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील आॅरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. आॅरेेंज कॉर्नर येथील एटीएम सेंटर स्टेट बँकेचे तर मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर हे कॅनरा बँकेचे आहे.

Two ATMs broke out in Sangamner: Theft of 21 lakhs | संगमनेरात दोन एटीएम फोडले : २१ लाखांची चोरी

संगमनेरात दोन एटीएम फोडले : २१ लाखांची चोरी

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील आॅरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. आॅरेेंज कॉर्नर येथील एटीएम सेंटर स्टेट बँकेचे तर मालदाड रस्ता येथील एटीएम सेंटर हे कॅनरा बँकेचे आहे. या दोन्ही एटीएम सेंटरमधील कॅश बॉक्स गॅस कटरने तोडून त्यातील सुमारे २१ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे दोन्ही एटीएम सेंटर फोडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आॅरेंज कॉर्नर येथील एटीएम सेंटर आठ महिन्यांपूवीर्ही फोडण्यात आले होते. पुन्हा येथेच चोरीची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Two ATMs broke out in Sangamner: Theft of 21 lakhs