पिस्तुलासह दोघे अटक
By Admin | Updated: July 15, 2014 00:47 IST2014-07-14T23:08:42+5:302014-07-15T00:47:40+5:30
शिर्डी : गुरूपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी शिर्डी पोलिसांनी येथून पाच किलोमीटर अंतरावरील नगर-मनमाड मार्गालगत

पिस्तुलासह दोघे अटक
शिर्डी : गुरूपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी शिर्डी पोलिसांनी येथून पाच किलोमीटर अंतरावरील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या एका बंद अवस्थेतील पेट्रोल पंपावर देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन तरुणांना ताब्यात घेतले़
रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सावळीविहीर फाट्यावर बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारात शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली़ या प्रकरणी एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह दत्तू पुंड व विवेक माळी यांना ताब्यात घेण्यात आले़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शरद अहिरे, इरफान शेख, बाळासाहेब कोळपे, शरद कदम व अल्ताफ शेख यांनी पेट्रोल पंपाच्या परिसरात छापा टाकून दत्तू पुंड (मूळ रा. पिंपळगाव लांडगा, हल्ली शिर्डी) याला एका देशी बनावटीचे पिस्तुलासह ताब्यात घेतले़
(तालुका प्रतिनिधी)