काष्टीत दोन पान टपऱ्यांवर छापा, दोघांना अटक (लोकमत इफेक्ट)
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:38+5:302020-12-05T04:38:38+5:30
काष्टी : श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटरवर छापा टाकून गुटख्यासह कार, असा आठ लाखांचा मुद्देमाल ...

काष्टीत दोन पान टपऱ्यांवर छापा, दोघांना अटक (लोकमत इफेक्ट)
काष्टी : श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटरवर छापा टाकून गुटख्यासह कार, असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी रात्री केली. ‘गुटखा विक्रीचे श्रीगोंदा ते सोलापूर-नगर कनेक्शन’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली.
पोलिसांनी काष्टीतील सचिन पांडुरंग कोकाटे, दीपक नाना टकले यांना अटक केली. काष्टीतील पानटपऱ्यांवरून गुटखा विक्री होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. गुरुवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस काॅन्स्टेबल किरण बोराडे, प्रताप देवकाते, अमोल आजबे, कुलदीप घोळवे, किरण भापकर, संतोष कोपनर, गोकुळ इंगवले यांनी दोन टपऱ्यांवर छापे टाकले. तीन लाखांचा गुटखा व पाच लाखांची कार जप्त केली.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात गुटखा विक्री होत असल्याबाबतचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. काष्टी येथूनही गुटखा विक्री होत असल्याचे म्हटले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली.
चौकट..
कर्जत, आष्टीपर्यंत विक्रीचे जाळे..
श्रीगोंदा, कोळगाव, बेलवंडी, मांडवगण येथील काही पानटपरीचालकांनी जोमात गुटखा विक्री सुरू केली आहे. काहींनी पंटरमार्फत कर्जत, आष्टी तालुक्यातही गुटखा विक्रीचे जाळे पसरवले आहे.
फोटो : ०४ काष्टी गुटखा
काष्टी येथे पोलिसांनी जप्त केलेला गुटखा.