तीस लाखांच्या खाद्यतेलाचा अपहार प्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:23+5:302021-06-18T04:15:23+5:30
नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला (वय ४१, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, धनराज कॉलनी, पवननगर, पाईपलाईन रस्ता, अहमदनगर), अनिल भारत मिरपगार (वय ३०, ...

तीस लाखांच्या खाद्यतेलाचा अपहार प्रकरणी दोघांना अटक
नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला (वय ४१, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, धनराज कॉलनी, पवननगर, पाईपलाईन रस्ता, अहमदनगर), अनिल भारत मिरपगार (वय ३०, रा. एपीजी, मिशन कंपाऊंड, तारकपूर अहमदनगर), किशोर पदुने (रा. वाळूंज, पंढरपूर, जि. औरंगाबाद) व अजय कांबळे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोतेला व मिरपगार यांना पोलिसांनी गोव्यातून पकडण्यात आले. पदुने व कांबळे हे दोघे पसार आहेत.
अशोककुमार रामनिवास चौधरी (वय ३२, रा. विष्णूनगर सोसायटी, इच्छापूर बसस्टॉप क्रमांक ३, सुरत-अजीरा रस्ता, सुरत, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील अरूण उदमले (ट्रकचालक, रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) व अफजल खान साहेबखान पठाण (ट्रकमालक, रा. मोमीनपुरा, संगमनेर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यांनी हा गुन्हा केला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर यांनी केली. अधिक तपास माळी करीत आहेत.