लुटमारीच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:03+5:302021-04-22T04:21:03+5:30

प्रशांत उर्फ मयुर राजू चावरे व बंडू उर्फ सूरज साहेबराव साठे (रा. दोघे सिद्धार्थनगर, अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची ...

Two accused in robbery case arrested | लुटमारीच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी जेरबंद

लुटमारीच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी जेरबंद

प्रशांत उर्फ मयुर राजू चावरे व बंडू उर्फ सूरज साहेबराव साठे (रा. दोघे सिद्धार्थनगर, अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अटक केलेले हे दोघे विजय पठारे व अजय पठारे यांच्या टोळीतील आहेत. पठारे टोळीने २० मार्च रोजी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानांमध्ये घुसून लूटमार केली होती. या टोळीतील अजय पठारे याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांना अटक झाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेडकॉन्स्टेबल बी. व्ही. काळे, डी. बी. जपे,

व्ही. आर. पठाण, कॉन्स्टेबल जावेद शेख, शैलेश गोमसाळे, संतोष राठोड, अनिकेत आंधळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two accused in robbery case arrested