बारा बोटी स्फोट घडवून फोडल्या
By Admin | Updated: June 6, 2014 01:01 IST2014-06-05T23:56:28+5:302014-06-06T01:01:38+5:30
कर्जत : सिद्धटेक येथील भीमा पात्रात अवैध वाळू उपसा करणार्यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करुन बारा बोटी स्फोट करून फोडून टाकल्या.
बारा बोटी स्फोट घडवून फोडल्या
कर्जत : सिद्धटेक येथील भीमा पात्रात अवैध वाळू उपसा करणार्यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करुन बारा बोटी स्फोट करून फोडून टाकल्या. या बोटींचा हक्क सांगण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे कर्जत व दौंडचे प्रशासन संयुक्त कारवाई करणार आहेत.
सध्या भीमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. सिद्धटेक, हिंगणी, बेरडी येथील वाळू उपसा करणार्यांवर दोन दिवसापूर्वी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी कारवाई केली. महसूल विभागाचे भरारी पथक येत असल्याचे समजताच या बोटीतील नागरिकांनी पाण्यात उड्या मारुन पलायन केले. पुणे हद्दीतील वाळू उपशाचे लिलाव झाले असून वाळू तस्कर कर्जत हद्दीतील वाळू बोटींच्या सहाय्याने गोळा करीत होते. वाळू उपसा करणार्या बारा बोटींचा ुजिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला.या बोटींचा हक्क सांगण्यास कोणीही पुढे न आल्याने दंड होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)