शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडाली बारावी विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

-------------- अहमदनगर : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ...

--------------

अहमदनगर : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे निकालाचे सूत्र ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार आहेत. परंतु हुशार विद्यार्थ्यांना याचाच फटका बसण्याची चिंता आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजे दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालातून प्रत्येकी ३० असे ६० टक्के मूल्यांकन होणार आहे, तर बारावीच्या पूर्व परीक्षेतून ४० टक्के गुण घेतले जाणार आहेत. मुळात विद्यार्थी बारावी हे महत्त्वाचे वर्ष गृहीत धरून अभ्यास करतात. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे असल्याने या वर्षात विद्यार्थी जास्त मेहनत हेऊन, खासगी शिकवण्या लावून गुणवत्ता वाढवण्यास प्रयत्नशील असतात. यातून अनेकदा विद्यार्थ्याचे दहावी व अकरावीच्या तुलनेत बारावीत गुण वाढल्याचेही दिसले आहे. परंतु यंदा कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा न झाल्याने बारावीच्या निकालात दहावी व अकरावीचे गुणही विचारात घेतले जाणार आहेत. अनेक मुलांना दहावी व अकरावीत कमी गुण असतात. परंतु हेच गुण विचारात घेतले जाणार असल्याने बारावीची गुणवत्ता ढासळण्याची चिंता मुलांना लागली आहे. अनेक जण अकरावी रेस्ट ईअर समजतात. त्यामुळे हुशार विद्यार्थीही अकरावीत केवळ उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास करतात. परंतु तेच रेस्ट ईअर यंदा बारावीच्या गुणांवर परिणाम करणार आहे. यामुळे अनेक पालक व विद्यार्थीही चिंतीत आहेत.

--------------

असे असेल बारावी निकालाचे सूत्र

दहावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण, अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण आणि बारावी पूर्व परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण बारावी निकालात विचारात घेतले जाणार आहेत. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीच्या गुणातील ३० टक्के आणि १२ वी च्या ४० गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.

----------------

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी-

सीबीएसई - ६४००

मुले - ४२१५

मुली - २२७६

स्टेट बोर्ड - ६४१२४

मुले - ३७०५२

मुली - २७०९२

---------

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार

प्रत्यक्ष परीक्षा झाल्या असत्या तर बारावीच्या मुलांना गुणवत्ता सिद्ध करता आली असती. परंतु आता परीक्षा न होता ३० टक्के सूत्राने अनेकांचे गणित बिघडणार आहे.

- सुकृत कुलकर्णी, विद्यार्थी (फोटो)

------------

कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक मुलांचा अभ्यास झाला नाही. परंतु जे हुशार मुले आहेत त्यांच्या बारावीच्या गुणांना ३०-३०-४० सूत्रानुसार फटका बसेल. त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- सोहम चिकटे, विद्यार्थी (फोटो)

--------------

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

कोरोनामुळे परीक्षा होणार नसल्याने बारावीच्या निकालासाठी दहावी व अकरावीच्या निकालाचा आधार घ्यावा लागला. यातून ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतेय असे वाटते, त्यांना श्रेणी सुधारनुसार परीक्षा देता येईल किंवा बारावीनंतर प्रवेश परीक्षा देऊनच पुढील दिशा निवडता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करावा.

- प्रा. सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना

(फोटो - २१सुनील पंडित)

----------------

ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाबाबत शंका असेल त्यांना स्वतंत्र परीक्षा देता येणार आहे. शिवाय विद्यार्थी पुढील करिअरच्या दिशा निवडताना त्या त्या प्रवेशाची सामाईक परीक्षा असतेच. तिथे त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

- प्रा. जितेंद्र आरू

(फोटो - २१जितेंद्र आरू)

--------------