शेवगावमध्ये दहावीची प्रश्नपत्रिकेतील प्रश्न फुटले : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:40 IST2019-03-13T17:39:46+5:302019-03-13T17:40:05+5:30
दहावीच्या भूमिती विषयाचा आज पेपर होता. यामध्ये शेवगावमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगावमध्ये दहावीची प्रश्नपत्रिकेतील प्रश्न फुटले : गुन्हा दाखल
शेवगाव : दहावीच्या भूमिती विषयाचा आज पेपर होता. यामध्ये शेवगावमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉस्न्टेबल किशोर आबासाहेब शिरसाठ यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्याद दाखल केली आहे.
आज बुधवार (दि. १३) रोजी इयत्ता १० वी चा भूमिती विषयाचा पेपर सुरु असताना शेवगाव चे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिरी रस्त्यावरील झेरॉक्स सेंटर समोर मुलांची गर्दी झाली होती. तेथे उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स काढून त्याची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भारत काळे पोलीस कॉ. वासुदेव डमाळे, संदीप दरवडे, सोमनाथ घुगे, वृषाली गर्जे यांचे पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी प्रश्न पत्रिकांच्या उत्तरांची झेरॉक्स प्रती तयार करून ती उपस्थित विद्यार्थ्यांना विक्री करत असताना आढळून आले. याबाबत झेरॉक्स सेंटर चालक सचिन खेडकर याच्या विरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर हे अधिक तपास करीत आहे. याबाबत संबंधित झेरॉक्स चालक सचिन अंबादास खेडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.