तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळे फासू
By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:30+5:302020-12-05T04:34:30+5:30
साई संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ...

तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळे फासू
साई संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येवून फलक काढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर शिर्डीतील महिलाही आक्रमक झाल्या. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना या निर्णयाबद्दल धन्यवाद दिले.
पेहरावाबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही. महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात. सोहळे घालून पंचाने अंग झाकणाऱ्या पुजाऱ्यांना अर्धनग्न म्हणणाऱ्या देसाईंचे संस्कृतीबद्दलच ज्ञानच अर्धवट असल्याचे दिसते. भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांत यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्या या वक्तव्याची सुसंस्कारित समाज गंभीर दखल घेईलच, पण देसाईंनी स्टंटबाजी करण्यासाठी शिर्डीत प्रवेश केला तर शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा जगताप यांनी दिला.
शिवसेनेच्या महिला तालुका संघटक स्वाती परदेशी म्हणाल्या, देसाईंनी दर्शनाला यावे. आम्ही त्यांचे स्वागत करू, मात्र फलक काढण्याची स्टंटबाजी केली तर सेना स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळे फासू. सुरेखा वैद्य-रणमाळे म्हणाल्या, येथे विदेशी भाविक येतात, तेही भारतीय पोशाख घालतात. आपल्या देशातीलच काहीजण अर्ध्या कपड्यात येतात, ही आपली संस्कृती नाही. ज्यांना असे कपडे घालण्याची हौस आहे, त्यांनी पर्यटनस्थळी जावे. महिलांच्या बाबतीत चांगल्या निर्णयावर महिलेनेच आक्षेप घेणे योग्य नाही.