सव्वीस लाखांच्या दारूसह ट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:49+5:302021-03-04T04:37:49+5:30
कोपरगाव : कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची दारूच्या भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स नांदेड जिल्ह्यात घेऊन जाणाऱ्या मालट्रकच्या चालकास चौघांनी ...

सव्वीस लाखांच्या दारूसह ट्रक पळविला
कोपरगाव : कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची दारूच्या भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स नांदेड जिल्ह्यात घेऊन जाणाऱ्या मालट्रकच्या चालकास चौघांनी मारहाण करून ट्रकसह सुमारे २६ लाख ४९ हजार ७४१ रुपयांची दारू चोरून नेली आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे २५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी चालक शरद गोपीनाथ वरगुडे (वय ४०, रा. संवत्सर, ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून योगेश कैलास खरात, संतोष गौतम खरात (रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव), धनंजय प्रकाश काळे (रा. रामवाडी सवंत्सर, ता. कोपरगाव) व एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांवर सोमवारी (दि. १ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील वाल्मीक कुऱ्हे यांनी त्यांच्या मालकीच्या दहा टायर ट्रक (एम. एच. ४१, जी. ६३९१) हा संतोष गौतम खरात (रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव) यांना विक्री केला होता. कागदपत्रे १ मार्च २०२१ रोजी करायचे होते. परंतु, वाल्मीक कुऱ्हे यांनी विश्वासाने हा ट्रक संतोष खरात यांना दिला होता. त्याच ट्रकवर शरद वरगुडे हे चालक होते. त्यामुळे ट्रकची विक्री केल्यानंतरही वरगुडे हेच चालक होते. त्यामुळे चालक वरगुडे यांनी कोपरगाव येथील नॅशनल रोडलाईन्सच्या माध्यमातून २५ फेब्रुवारीला कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यातून नांदेड जिल्ह्यात दारूचा माल पाठवण्यासाठी भाडे ठरवले होते. त्यानुसार त्याच दिवशी चालक वरगुडे व योगेश खरात, धनंजय काळे यांनी दुपारी ३ वाजता ट्रक कारखान्यात नेऊन त्यात दारूचा माल भरल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास सर्व कागदपत्र घेऊन नांदेडच्या दिशेने घेऊन निघाले. ट्रक घेऊन झगडे फाटा येथे आले असता, त्या ठिकाणी संतोष खरात आलेला होता. त्यावर योगेश खरात याने वरगुडे यांना मारहाण करून खाली उतरून दिले. वरील चौघे दारूने भरलेला घेऊन निघून गेले.