ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: April 4, 2017 15:44 IST2017-04-04T15:44:11+5:302017-04-04T15:44:11+5:30
नगर-मनमाड रोडवरील विळद घाटात ट्रकचालकाला दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला.

ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ ४- नगर-मनमाड रोडवरील विळद घाटात ट्रकचालकाला दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. ट्रकचालकाचा चोरीस गेलेला माल अपघातात मय झालेल्या दोघांकडे आढळून आल्याने हे तेच चोरटे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गणेश बाळासाहेब काळे (वय १८ रा़ देहरे), असे अपघातात मयत झालेल्यापेकी एकाचे नाव आहे़ दुसऱ्या मयताबाबत पोलीस तपास करत आहेत.
मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खेताराम चौधरी हा परप्रांतीय ट्रकचालक मनमाडहून नगरच्या दिशेने येत असताना विळद घाट येथे चौघा जणांनी दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील दोन मोबाईल व २१ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर ट्रकचालकाने एमआयडीसीत फिर्याद दाखल केली़ ही घटना घडल्यानंतर विळदघाट येथे दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली़ घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा़ ट्रकचालकाने वर्णन केलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल व चोरीस गेलेले पैसे मयतांजवळ आढळून आले. चोरी केल्यानंतर पळून जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने या दोघांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या चोरी प्रकरणातील इतर दोघे पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.