ट्रक चालकाला दोन वर्षे कारावास
By Admin | Updated: October 13, 2014 23:07 IST2014-10-13T23:05:39+5:302014-10-13T23:07:21+5:30
अहमदनगर: एस.टी. बसमधील १३ जणांचा मृत्यू आणि ३४ प्रवाशांच्या जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकास एक वर्ष कारावासाची शिक्षा झाली आहे.

ट्रक चालकाला दोन वर्षे कारावास
अहमदनगर: तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात एस.टी. बसला धडक देऊन एस.टी. बसमधील १३ जणांचा मृत्यू आणि ३४ प्रवाशांच्या जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. कुलकर्णी यांनी ट्रकचालकास एक वर्ष व दहा महिने साध्या कारावासाची शिक्षा झाली आहे.
बेभानपणे ट्रक चालविल्याने कळंब-पुणे या एस.टी. बसला ट्रकची जोरदार धडक बसली होती. २३ जानेवारी २००९ रोजी चिचोंडी पाटील शिवारात झालेल्या या अपघातात १३ जणांचा मृत्यू, तर ३४ जण जखमी झाले होते. या प्रकरणी ट्रकचालक बाळू उर्फ बालसुंदरम जीवरत्नम याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सहायक सरकारी अभियोक्ता नितीन वाघ यांनी १५ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला एक वर्ष व १० महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अपघातामध्ये बस कापली गेल्याने मोठे नुकसान झाले होते.
(प्रतिनिधी)