नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रकची समोरासमोर धडक, ट्रकचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:54 IST2017-10-10T16:47:07+5:302017-10-10T17:54:47+5:30
नगर- सोलापूर महामार्गावर मंगळवारी पहाटे घोगरगाव शिवारात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे ट्रकमधील चालक आतमध्ये अडकून पडले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर चालक बाहेर काढण्यात यश आले. जखमी ट्रकचालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रकची समोरासमोर धडक, ट्रकचालक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा (अहमदनगर) : नगर- सोलापूर महामार्गावर मंगळवारी पहाटे घोगरगाव शिवारात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे ट्रकमधील चालक आतमध्ये अडकून पडले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर चालक बाहेर काढण्यात यश आले. जखमी ट्रकचालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पहाटे पाचच्या सुमारास नगरहून सोलापूरकडे जाणारा ट्रक ( टीएन- बीएक्स- १०९२) व सोलापूरहुन नगरकडे येणारा ट्रक ( आरजे- १९- जीसी- ७७९२) यांच्यामध्ये घोगरगाव शिवारात समोरासमोर धडक झाली. ट्रकचा समोरचा भाग एकमेकांमध्ये गुंतला गेला. त्यामुळे दोन्ही ट्रकमधील चालक या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस पाटील सुदाम बोरुडे यांनी दिली.
अपघातस्थळी इतर चालकांनी व ग्रामस्थांनी दोन्ही ट्रक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी संभाजी वाबळे, वैभव गांगर्डे यांनी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला. या अपघातामुळे मार्र्गावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली.