भरधाव वाळूच्या ट्रकची मोटार सायकलची धडक, एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:10 IST2018-01-18T16:09:55+5:302018-01-18T16:10:34+5:30

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

A truck carrying a sand truck collided with a bicycle and killed one on the spot | भरधाव वाळूच्या ट्रकची मोटार सायकलची धडक, एकजण जागीच ठार

भरधाव वाळूच्या ट्रकची मोटार सायकलची धडक, एकजण जागीच ठार

टाकळी ढोकेश्वर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाळू ट्रक (क्रमांक एम. एच. १६ - एई ९८११) नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जात होता. कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर या ट्रकने मोटारसायकल (क्र. एम एच १६, एबी ९२७४) ला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार कोंडीबा अण्णा लष्करे (वय ५२, रा. माळवाडी, ढवळपुरी) हे जागीच ठार झाले आहे. याबाबत अरूण कोंडीबा लष्करे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मयत लष्करे हे टाकळी ढोकेश्वरकडे येत असताना हा अपघात झाला. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयात गुरूवारी (दि. १८) सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार अशोक भोसले, पोलीस नाईक संतोष शेळके, निवृत्ती साळवे, शरद पवार आदी करत आहेत.

Web Title: A truck carrying a sand truck collided with a bicycle and killed one on the spot