नेवासामध्ये बस - ट्रकचा अपघात : २५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:17 IST2018-11-27T15:08:06+5:302018-11-27T15:17:41+5:30

देवगड फाटा - खडकाफाटा दरम्यान बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघाचामध्ये २५ प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

Truck accident: 25 passengers injured | नेवासामध्ये बस - ट्रकचा अपघात : २५ प्रवासी जखमी

नेवासामध्ये बस - ट्रकचा अपघात : २५ प्रवासी जखमी

नेवासा : देवगड फाटा - खडकाफाटा दरम्यान बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघाचामध्ये २५ प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यामधील दोन प्रवाशांना नगर तर एकाल औरंगाबादला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये ४६ प्रवाशी प्रवास करत होते. मेहकर आगाराची बस(क्रमांक एम.एच- ४० वाय-५३४६) बस पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती.
जखमींची नावे : 
जाकीर शेख(वय-४५, औरंगाबाद), मारुती शेकरे(६५, हातगाव), भगवान भुतेकर(७०, पळसखेड), मंदा अशोका चांगाडे(४०), संजय दिगंबर जोशी( मेहकर), सावित्रीबाई भगवान भुतेकर(६०, पळसखेड), प्रकाश भिमराव शिंदे(३२), शशीकला नलगे(६०, शिरोडा), विश्वास बबन सुर्वे ( २४, पुणे), त्रिबंक बडे( ७२), प्रल्हाद टापरे ६५, परांडा), पदमावत उदळकर(६५, मेहकर), सिताराम पवार(७२, हातगाव), सुनंदा मोहन चव्हाण(४५), नारायण शिंदे, दगडाई टापरे, सुलोचना काळे, कावेरी बोंदरे, मुक्ता शिंदे(परतूर) 

 

Web Title: Truck accident: 25 passengers injured