शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती तुपे खून प्रकरणात आणखी तिघांचा समावेश

By admin | Updated: August 26, 2014 23:22 IST

पारनेर : तृप्ती तुपे हिचा खून करणाऱ्या संतोष विष्णू लोणकर (वय ३२) याच्याबरोबर आणखी दोघा जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पारनेर : अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थीनी व लोणी मावळा येथील रहिवासी तृप्ती तुपे हिचा खून करणाऱ्या संतोष विष्णू लोणकर (वय ३२) याच्याबरोबर आणखी दोघा जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या दोघांनाही पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात दहावीत शिक्षण घेणारी तृप्ती पोपट तुपे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान लोणी मावळा येथील घरी जात होती. यावेळी कुकडी कालवा पोटचारीच्या पुलाखाली ओढून तिचा खून केल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध करीत तपास लवकर लावा अन्यथा आमच्या पहिलीपासून पदवी पर्यंतच्या मुलींचे शाळा बंद आंदोलन करू, असा इशारा दिला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस उपअधीक्षक वाय. डी.पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी विशेष पोलिस पथके तैनात करून सर्व बाजुंनी तपासाची सूत्रे हलविल्यानंतर संतोष विष्णू लोणकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. मात्र यामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामाध्यमातुन पोलिसांनी पुन्हा तपास केल्यानंतर लोणी मावळा येथीलच दोन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोघांचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) बहिष्कार मागेतृप्ती तुपे हिच्या खुनाचे मारेकरी सापडेपर्यंत गावातील पहिली ते पदवी पर्यंतच्या मुलींना शाळेत न पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी मंगळवारी मागे घेतला. सोमवारी शाळेवर बहिष्कार टाकणाऱ्या मुलींना मंगळवार पासुन शाळेत जाण्यास सुरवात केली आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व गावातील संस्थेची माध्यमिक शाळा आहे. तेथेही मुलींची उपस्थिती आज होती. तर गावातून दुसरीकडे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींनीही आपले दैनंदिन काम सुरू केले आहे.