तिसगाव येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:17+5:302021-03-23T04:23:17+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, व्यापारी, ...

तिसगाव येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ, व्यापारी, माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच काशीनाथ लवांडे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, भाजप तालुका चिटणीस नंदकुमार लोखंडे, प्रा. इलियास, रफिक, भाऊसाहेब लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख शरद शेंदुरकर, मनोज ससाने, अनिल डागा, सुनील पुंड, गणेश गारदे, राजू परमार, संतोष छाजेड, दिलीप गांधी, राजू भुजबळ, संजय लवांडे, लक्ष्मण गवळी, मनोज सुंदेचा, नीलेश गारदे, अरिफ तांबोळी, निसार शेख, दादा पाठक, भास्कर काळे, सुभाष खंडागळे आदींनी गांधी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ग्राम विस्तार अधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले.