वृक्षारोपण करून दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:59+5:302021-03-24T04:18:59+5:30
तपोवन रोड येथील अभिनव विद्यामंदिर येथे मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राम घुले महाराज, जय हिंद ...

वृक्षारोपण करून दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
तपोवन रोड येथील अभिनव विद्यामंदिर येथे मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राम घुले महाराज, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, निवृती भाबड, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब देशमाने, बन्सी दारकुंडे, रघुनाथ औटी, अंबादास बडे, शिवाजी खाडे, खंडेराव लेंडाळ, महादेव शिरसाठ, भगवान डोळे, अंकुश भोस, महादेव झिरपे, विठ्ठल लगड, संतोष शिंदे, अमोल निमसे, मयूर नवगिरे, प्रसाद शिंदे, फकीरचंद वाळ, नामदेव तांदळे, ज्ञानदेव दाणी, दीपक भिंगारे, आदी उपस्थित होते.
पालवे म्हणाले, स्व. दिलीप गांधी याचे राजकारणातील कार्य देशभक्तीने भारावलेले होते. त्यांना आजी-माजी सैनिकांबद्दल अभिमान व मोठी आत्मीयता होती. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची सुरुवातदेखील त्यांच्या हस्ते झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फोटो मेलवर आहे
ओळी- जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील अभिनव विद्यामंदिरात माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षरोपण करून माजी सैनिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.