१७ महाराष्ट्र बटालियनचे ट्रेकिंग अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:47+5:302021-02-26T04:27:47+5:30

शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील निवडक छात्रासह कर्जत ते रेहकुरी अभयारण्यापर्यंत ट्रेकिंग अभियान राबविण्यात ...

Trekking expedition of 17 Maharashtra Battalion | १७ महाराष्ट्र बटालियनचे ट्रेकिंग अभियान

१७ महाराष्ट्र बटालियनचे ट्रेकिंग अभियान

शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील निवडक छात्रासह कर्जत ते रेहकुरी अभयारण्यापर्यंत ट्रेकिंग अभियान राबविण्यात आले. रेहकुरी अभयारण्यापर्यंत सुमारे ३० किलोमीटरची भ्रमंती छात्रांनी केली. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा छात्र देविका भागडे व ललिता म्हेत्रे यांनी आपल्या हातावर उचलून धरला होता. सुरूवातीला प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. छात्र प्रतीक्षा वाघमोडे या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपले विचार मांडले. या अभियानासाठी प्रा. किसन सूळ, अंजली शेटे, गीता नेवसे, किरण गोरे यांच्यासह सर्व छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले.

--------------

फोटो - २५एनसीसी

एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांनी शिवजयंतीनिमित्त ट्रेकिंग अभियान राबविले.

Web Title: Trekking expedition of 17 Maharashtra Battalion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.