एसटीतून होणार भाजीपाल्याची होणार वाहतूक; श्रीरापुरातून पाच बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:17 IST2020-05-29T17:16:22+5:302020-05-29T17:17:42+5:30
नगर जिल्ह्यात सुरू केलेल्या बसच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन वाहने सध्या मालाची वाहतूक करीत आहेत. आणखी पाच बस लवकरच धावणार आहेत. भाजीपाला मुंबईला पोहोच करण्यासाठी शेतक-यांची मागणी वाढली आहे.

एसटीतून होणार भाजीपाल्याची होणार वाहतूक; श्रीरापुरातून पाच बस धावणार
श्रीरामपूर : जिल्ह्यात सुरू केलेल्या बसच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन वाहने सध्या मालाची वाहतूक करीत आहेत. आणखी पाच बस लवकरच धावणार आहेत. भाजीपाला मुंबईला पोहोच करण्यासाठी शेतक-यांची मागणी वाढली आहे.
राज्य सरकारने आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली. प्रत्येक बाकावर एक प्रवाशाला बसण्याची मुभा देण्यात आली. मात्र असे असले तरी कोरोनाच्या धास्तीमुळे प्रवाशांनी एसटी सेवेकडे पाठ फिरविली आहे. दिवसभर बसस्थानक ओस पडल्याचे चित्र आहे. श्रीरामपूर आगारातून सध्या केवळ नगर व कोपरगावकरिता बसेसच्या प्रत्येकी १२ व ६ फेºया सुरु आहेत. इतर बसला प्रवाशांकडून मागणी नसल्याचे त्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.
जिल्ह्यात प्रथम श्रीरामपूर आगाराने मालवाहतूक वाहने सुरू केली. चाकण व हडपसर येथे केमीकलची आॅर्डर बसेसना मिळाली आहे. सध्या तीनही वाहने सुरू आहेत. लवकरच पाच मालवाहतूक करणा-या बसेस आगारात दाखल होणार आहेत. राहुरी, राहाता येथील शेतक-यांकडून त्याकरिता मागणी होत आहे. मुंबई व इतर शहरांमध्ये भाजीपाला पुरविण्याकरिता शेतकरी एसटीला पसंती देत मिळत आहे.