अहमदनगरचा जवान देतोय राजपथावरील संचलनाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:36 IST2018-01-12T19:01:19+5:302018-01-13T11:36:45+5:30
२६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून संदीप तांबे यांची निवड झाली आहे.

अहमदनगरचा जवान देतोय राजपथावरील संचलनाचे प्रशिक्षण
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : २६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून संदीप तांबे यांची निवड झाली आहे. संदीप तांबे हे पारनेर तालुक्यातील गोरेगावचे सुपूत्र असून, ते सशस्त्र सीमा दलात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत आहेत.
२६ जानेवारी रोजी ६८ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनी राजपथावर भारतीय सैन्याचे संचलन होते. सैन्याचे हे संचलन देशासाठी गौरवास्पद बाब असते. हा गौरवास्पद सोहळा साजरा करण्यासाठी दिल्लीत भारतीय जवानांच्या प्रशिक्षणाची धूम सुरू आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही हे प्रशिक्षण सुरू आहे. सशस्त्र सीमा दलाची १४४ जणांची तुकडी पहाटेपासून संचलनाचा सराव करीत आहे. या तुकडीला भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलाच्या अकादमीतील प्रशिक्षक संदीप तांबे यांच्यासह १४ प्रशिक्षकांची टीम हे प्रशिक्षण देत आहेत.
संदीप तांबे हे २००५ मध्ये सशस्त्र सीमा दलात भरती झाले़ २००७ मध्ये त्यांनी प्रशिक्षकपदाचा कोर्स केला आणि २०१२ पासून ते प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. संदीप तांबे हे सध्या भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या संचलनाची तयारी करवून घेण्यासाठी तांबे सध्या दिल्लीत आहेत. संचलनाच्या तयारीसाठी निवडक प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यात संदीप तांबे यांची निवड झालेली आहे.