आमदारांपुढे व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:26+5:302021-09-04T04:26:26+5:30
पवार म्हणाले, शहरातील विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे काम चालू आहे. माझं गाव माझा विकास उपक्रमातून आपण गावाचा विकास करू ...

आमदारांपुढे व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
पवार म्हणाले, शहरातील विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे काम चालू आहे. माझं गाव माझा विकास उपक्रमातून आपण गावाचा विकास करू शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन विविध मार्गदर्शक सूचना करून श्रमदान करावे. त्यातून निश्चितच ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले गाव पर्यटनक्षेत्र व तीर्थक्षेत्र होईल, असे पवार यांनी सांगितले.
शौचालयाची सुविधा नाही, सेंट्रल बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता व कामास होणारा विलंब, नवीन राष्ट्रीयीकृत बँक, मोकाट जनावरांचा होणारा त्रास, ग्रामस्वच्छता, गावात होणाऱ्या चोऱ्या, शहरात चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास, रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी, शहरात सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा अशा विविध प्रश्नांकडे ग्रामस्थांनी पवार यांचे लक्ष वेधले.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, व्यापारी असोसिएशनचे शिवकुमार गुळवे, किशोर कांकरीया, रमेश खिवसरा, राहुल कातोरे, अनिल रासने, सचिन लोळगे, सुहास शहा, जमीर सय्यद, तुळशीदास गोपाळघरे, डॉ. अंकुश गोपाळघरे, डॉ. राजेंद्र नागरगोजे, डॉ. विश्वनाथ ढाळे, प्रवीण कोरे, किशोर दुशी उपस्थित होते.