ट्रॅक्टर ट्रेलर-ट्रक अपघातात चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:38 IST2021-02-28T04:38:32+5:302021-02-28T04:38:32+5:30

श्रीगोंदा : उसाचा टॅक्टर ट्रेलर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. ...

Tractor trailer-truck crash kills driver | ट्रॅक्टर ट्रेलर-ट्रक अपघातात चालक ठार

ट्रॅक्टर ट्रेलर-ट्रक अपघातात चालक ठार

श्रीगोंदा : उसाचा टॅक्टर ट्रेलर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर‌-दौंड रोडवर लोणी व्यंकनाथ बसस्थानकासमोर घडला.

बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता. बारामती) असे अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. दुधाचा टँकर बारामतीवरून नाशिकला दूध भरण्यासाठी जात होता. यावेळी नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या टेलरची व टँकरची समोरासमोर धडक झाली. यात टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना लोणी व्यंकनाथ युवकांनी तातडीने दवाखान्यात पाठविले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

Web Title: Tractor trailer-truck crash kills driver