पोलीस शोधताहेत टॉवेलात धागे-दोरे

By Admin | Updated: July 6, 2014 00:17 IST2014-07-05T23:07:34+5:302014-07-06T00:17:50+5:30

अहमदनगर: कापडबाजारातील चोरट्यांनी टॉवेलवर येऊन चोऱ्या केल्या. जाताना मात्र नवे कपडे घालून गेले. जाताना चोरट्यांनी नेसून आलेला टॉवेल दुकानाच्या मागेच टाकून पसार झाले.

The towel threads are in search of the police | पोलीस शोधताहेत टॉवेलात धागे-दोरे

पोलीस शोधताहेत टॉवेलात धागे-दोरे

अहमदनगर: कापडबाजारातील चोरट्यांनी टॉवेलवर येऊन चोऱ्या केल्या. जाताना मात्र नवे कपडे घालून गेले. जाताना चोरट्यांनी नेसून आलेला टॉवेल दुकानाच्या मागेच टाकून पसार झाले. या टॉवेलमध्येच तपासाचे धागे-दोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमधील चोर गेले कुठे? या प्रश्नाने पोलीसही चिंताग्रस्त झाले आहेत. तिसरा दिवस उलटून गेला तरी चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.
कापड बाजारातील आठ दुकानांमध्ये गुरुवारी पहाटे चोऱ्या झाल्या होत्या. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. चोरीबाबत त्यांच्याकडून कोणताही उलगडा झाला नाही. दुकानांच्या पाठीमागील भिंतीवरून चोर जसे चढले, तसेच तेथूनच ते उतरले. त्या ठिकाणी पोलिसांनी एक पांढरा टरकीशचा टॉवेल आणि एक तोडलेले कुलूप सापडले. या टॉवेलमध्येच तपासाचे धागे-दोरे सापडतील, अशी पोलिसांची खात्री होती. या टॉवेलवर कापडबाजारापासून जवळच असलेल्या एका लॉण्ड्रीचे लेबल होते. पोलिसांनी त्या लॉण्ड्रीचालकाकडे चौकशी केली. येथून पुढे कपड्यांना लावलेल्या लेबलवर मोबाईल क्रमांक टाकण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. हा टॉवेल कुठून आला, कोणी दिला की चोरट्यांनी टॉवेलची चोरी केली, याबाबत कोणताही उलगडा झाला नाही. त्यामुळे तपासाचे धागे-दोरे तुटले.
दरम्यान दोन संशयितांकडे चौकशी करूनही काहीच हाती लागले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपलेले चोर आता नेमके कुठे गेले? या प्रश्नाने पोलिसही चक्रावले आहेत. तपासाला गती न आल्याने बाजारातील व्यापारीही संतापले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The towel threads are in search of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.