शिर्डीत होणार टुरीझम पोलीस आऊट पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:09+5:302020-12-27T04:16:09+5:30

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. साईमंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरीझम पोलीस आउट ...

Tourism police outpost to be held in Shirdi | शिर्डीत होणार टुरीझम पोलीस आऊट पोस्ट

शिर्डीत होणार टुरीझम पोलीस आऊट पोस्ट

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. साईमंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरीझम पोलीस आउट पोस्ट उभारण्यात येणार असुन याचा प्रारंभ येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी केला जाईल, अशी माहीती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिली.

पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. दर्शनानंतर त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रविण लोखंडे, वाहतुक शाखेचे निरीक्षक नारायण न्याहळदे आदींची बैठक घेतली. यानंतर जयस्वाल म्हणाले, साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. मंदिर प्रशासनासोबत चर्चा करुन मंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरीझम आऊट पोस्ट उभारणार आहे.

..........

बहुभाषिक पोलिसांची नियुक्ती

या ठिकाणी विविध राज्याची भाषा अवगत असणारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची नेमणुक केली जाईल. भाविकांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊन नये, यासाठी नेमणुक केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाईल. मंदिर परीसरात होणारी मोबाईल चोरीसह विविध घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना केल्या जाणार आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला मनष्यबळाची कमतरता असल्याने लवकरच यात वाढ केली जाईल.

...........

संस्थानचे कौतुक

साईसंस्थानने कोव्हीडच्या पार्श्वभुमीवर अतिशय चांगल्या प्रकारची उपाय योजना केल्या आहेत. दर्शन रांगेत प्रवेश करताना भाविकांचे तापमान, मास्कचा वापर, दर्शन रांगेत सहा फुटांवर चौकोन, दर्शन रांगेत पाय धुण्यासाठी पाणी व्यवस्था, २२ ठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर मशिन या उपाययोजना महत्वाच्या केल्या आहेत, असे सांगत महासंचालक जयस्वाल यांनी साई संस्थानचे कौतुक केले.

.......

फोटो

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.

Web Title: Tourism police outpost to be held in Shirdi