मुलास नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 15:11 IST2020-09-26T15:10:06+5:302020-09-26T15:11:24+5:30
भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलास नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून महिलेचे शारीरिक शोषण करणा-या कॅन्टोन्मेंट बोर्डातील सिनिअर क्लर्क विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलास नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
अहमदनगर : भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलास नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून महिलेचे शारीरिक शोषण करणा-या कॅन्टोन्मेंट बोर्डातील सिनिअर क्लर्क विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने २० सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. शिशिर पाटसकर असे गुन्हा दाखल झालेल्या क्लर्कचे नाव आहे. पाटसकर याने ‘तुमच्या मुलास कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे नोकरीस लावतो’ असे आश्वासन देत पीडित महिलेस २०१७ मध्ये नेवासा येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नगर शहराजवळील एमआयडीसी येथे अत्याचार करून धमकी दिल्याचे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे.
नेवासा पोलिसांनी अद्यापपर्यंत या प्रकरणात आरोपीला अटक केलेली नाही.