जिल्हा परिषद शाळेत विषयनिहाय शिक्षक

By Admin | Updated: May 26, 2014 00:24 IST2014-05-26T00:02:24+5:302014-05-26T00:24:38+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

Topics teachers in Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेत विषयनिहाय शिक्षक

जिल्हा परिषद शाळेत विषयनिहाय शिक्षक

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी तालुकास्तरावरून जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांची माहिती मागवली आहे. माध्यमिक शाळांमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक विषयनिहाय शिक्षक अध्यापनासाठी असतात, त्याचधर्तीवर जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या शाळेत विषय शिक्षक देण्यात येणार आहे. भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान या तीन प्रमुख विषयांचा यात समावेश राहणार आहे. जिल्ह्यात मराठी माध्यमाचे ६३४ आणि ६५ उर्दू माध्यमाचे शिक्षक आहेत. या शिक्षकांची १२ वी, बीएड् आणि पदवी घेतलेले वर्ष, कोणत्या शाखेतून पद्वी घेतली, सलग सेवेची माहिती आणि विद्यापीठाचे नाव आदीची माहिती जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग संकलित करत आहे. बीए उत्तीर्ण शिक्षकाचा विषय मराठी, इंग्रजी आणि हिंदी असल्यास त्याला भाषा विषय, इतिहास- भूगोल विषय असणार्‍या शिक्षकाला समाज शास्त्र, बीएस्सी उत्तीर्ण शिक्षकाला गणित आणि विज्ञान विषय अध्यापनासाठी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सोमवारपर्यंत ही सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतर बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देत, त्यांची विषय तज्ज्ञ शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून येत्या जून महिन्यापासून शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवी शाळांमध्ये विषयनिहाय अध्यापन होणार आहे. (प्रतिनिधी)बालकांचा मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ५० महिला शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, पोषण आहार समिती यांचे शिक्षकांशी चांगले संबंध प्रस्तापित व्हावेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा शाळेकडे ओढा वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात आहेत. ५० टक्के महिला शिक्षक नियमाची जिल्ह्यात अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा आणखीन वाढावा. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पट संख्या वाढवावी, यासाठी आरटीई कायद्यानुसार विषय निहाय शिक्षक देण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. - दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Topics teachers in Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.