पोषण आहाराचा विषय गाजला
By Admin | Updated: August 20, 2014 23:30 IST2014-08-20T23:22:15+5:302014-08-20T23:30:57+5:30
अहमदनगर : विद्यार्थ्यांना पूरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारची पडताळणी न करताच कोट्यवधी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेली आहेत.

पोषण आहाराचा विषय गाजला
अहमदनगर : विद्यार्थ्यांना पूरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारची पडताळणी न करताच कोट्यवधी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेली आहेत. हा विषय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत गाजला. यावेळी संबंधीत पुरवठादार यांची चौकशी करून बिले काढणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी शालेय पोषण आहारातील अनियमिततेचा विषय सदस्य संभाजी दहातोंडे यांनी काढला. सहा महिन्यांपूर्वी पोषण आहाराची तालुकास्तरवर पडताळणी करण्याचे, तांदुळाचा दर्जा तपासण्याचे शिक्षण विभागाने देऊन ही त्याकडे दुर्लक्ष झाले. तसेच कोट्यावधी रुपयांचे बिल काढण्यात आला आल्याच्या आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला.
४ थी आणि ७ वी शिकणाऱ्या विद्याथ्यापैकी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षेची फी भरण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून तरतूद करण्याचा निर्णय झाला. यंदा मात्र, प्रज्ञा शोध परीक्षेसाठी असणारा निधी याकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांसोबत दोन केंद्रप्रमुखांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रभाग समितीच्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे सुचित करण्यात आले. सभेला परतब नाईकवाडी, अॅड. आझाद ठुबे, नंदा भुसे, दहातोंडे, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, सुलोचना पटारे, सुनंदा ठुबे, गुलाब सय्यद आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)