लोकमत दिवाळी महोत्सव सोडत उद्या

By Admin | Updated: December 15, 2015 23:16 IST2015-12-15T23:06:19+5:302015-12-15T23:16:17+5:30

अहमदनगर : ‘लोकमत दिवाळी महोत्सवा’ची बहुप्रतिक्षीत सोडत गुरूवार, १७ डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्त ‘म्युझिक मस्ती आॅर्केस्ट्रा’ या बहारदार संगीत-नृत्य संध्येची मेजवानी नगकरांना मिळणार आहे.

Tomorrow's leaving the Lokmat Diwali Festival | लोकमत दिवाळी महोत्सव सोडत उद्या

लोकमत दिवाळी महोत्सव सोडत उद्या

अहमदनगर : ‘लोकमत दिवाळी महोत्सवा’ची बहुप्रतिक्षीत सोडत गुरूवार, १७ डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्त ‘म्युझिक मस्ती आॅर्केस्ट्रा’ या बहारदार संगीत-नृत्य संध्येची मेजवानी नगकरांना मिळणार आहे.
सायंकाळी ५ वाजता झोपडी कॅन्टीन जवळील माऊली संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात टाटा नॅनोसह शेकडो बक्षिसांचे मानकरी जाहीर होणार आहेत. मुंबई येथील निता पाटील, गायक वाजीद शेख, जितेंद्र भारस्कर, रोहिणी देवरे व हास्य कलाकार राहुल कुमार हे कलावंत धमाल सादरीकरण करणार आहेत.
महोत्सवात बम्पर बक्षीस टाटा नॅनो कार आहे. व्दितीय बक्षीस बुलेट, तृतीय बक्षीस बेडरूम सेट, चौथे बक्षीस रेफ्रिजरेटर, पाचवे बक्षीस वॉशिंग मशिन कोणते ग्राहक पटकवणार, या विषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कार्यक्रमाला मान्यवर व्यवसायिक, जाहिरातदार, वाचक, यांच्यासह लोकमत सखी मंच, बालविकास मंच व युवा मंच सभासद उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट आहेत तर

Web Title: Tomorrow's leaving the Lokmat Diwali Festival