टोल नाका सज्ज मात्र लोणी व्यंकनाथ शिवारात रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:47+5:302021-09-09T04:26:47+5:30
श्रीगोंदा : नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूल करण्यासाठी निमगाव खलू शिवारात टाेल नाका सज्ज झाला आहे. मात्र लोणी व्यंकनाथ ...

टोल नाका सज्ज मात्र लोणी व्यंकनाथ शिवारात रस्त्याची दुरवस्था
श्रीगोंदा : नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूल करण्यासाठी निमगाव खलू शिवारात टाेल नाका सज्ज झाला आहे. मात्र लोणी व्यंकनाथ शिवारात रस्त्याची दुरवस्था कायम आहे. रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे.
नगर-दौंड रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र चिखली घाट आणि लोणी व्यंकनाथ शिवारात दिनेश अग्रवाल कंपनीने काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक करणे जीवघेणे झाले आहे. चिखली घाटातील सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे.
लोणी व्यंकनाथ शिवारात नगर-दौंड लोहमार्गावर उड्डाणपूल करण्याच्या नावाखाली ठेकेदाराने दीड किलोमीटरचा रस्ता अपूर्ण अवस्थेत ठेवला आहे.
पूर्वीचे डांबरीकरण खोदून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस पडला की खड्डे जलमय होतात आणि तळ्याचे स्वरुप येते. उड्डाणपूल मंजुरीची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. पूल होण्यास अवधी लागणार मात्र तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
---
फोटो आहे