शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून निळवंडेचे आवर्तन

By admin | Updated: June 19, 2016 23:11 IST

राजूर : सोमवारी दि.२० ला दुपारी १२ वा. अकोले-संगमनेर तालुक्यांसाठी निळवंडे धरणातून या वर्षीचे अखेरचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार

राजूर : सोमवारी दि.२० ला दुपारी १२ वा. अकोले-संगमनेर तालुक्यांसाठी निळवंडे धरणातून या वर्षीचे अखेरचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
भंडारदरा, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्राबरोबरच पाणलोटातही अद्याप पावसाचे आगमन झाले नाही. त्यातच या दोन्ही धरणांमध्ये मृतसाठा वगळता अर्धा टीएमसीहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारदरा धरणातून अगोदरच पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, हे पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून सुरुवातीला १ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडता येणार आहे. मात्र जसजशी पाणी पातळी कमी होत जाईल तसा पाण्याचा विसर्गही कमी होत जाणार आहे. धरणातून निघणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी होत गेल्यानंतर नदीपात्रातील पाण्याचा वेगही कमी होणार असल्यामुळे संगमनेरपर्यंत पाणी पोहचते की नाही याबाबत शंकाच आहे.
भंडारदरा व निळवंडे या धरणांमध्ये मृत साठ्यासह असणारे उपलब्ध पाणी पुढील प्रमाणे- भंडारदरा- ३९७ दलघफू आणि निळवंडे ४७२ दलघफू. २०१५-१६ मध्ये आतापर्यंत भंडारदरा-निळवंडे धरणातून या आवर्तनासह एकूण १३ आवर्तने सोडण्यात आली.
(वार्ताहर)
मागील वर्षी या दोन्ही धरणांच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन झाले होते. भंडारदरा धरणात नऊ जूनपासूनच नवीन पाण्याची आवकही सुरू झाली होती. तर २० जूनपासून पाण्याची आवकही चांगलीच वाढली होती. परंतु यंदा मात्र आजपर्यंत पाऊस नसल्याने नवीन पाण्याची आवक झालेली नाही.