नगर जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन ११ रुग्ण, एकट्या अकोले तालुक्यात सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:47 IST2020-06-02T16:46:20+5:302020-06-02T16:47:03+5:30
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ११ नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, नगर, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत.

नगर जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन ११ रुग्ण, एकट्या अकोले तालुक्यात सहा रुग्ण
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी ११ नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, नगर, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत.
मंगळवारी आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील १, संगमनेर येथील एक, मसने फाटा पारनेर येथील एक आणि नगर तालुक्यातील २ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७८ एवढी झाली आहे.
नगर जिल्ह्यात आणखी ११ नवीन रुग्ण तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. अकोले तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले. त्यामध्ये जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
संगमनेर तालुक्यात दोन जण आढळून आले आहेत. डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिला बाधित झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. लोणी (ता. राहाता) येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे. नगर शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील ३३ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६३ एवढी झाली आहे.