तळेगाव शिवारात बर्निंग टेम्पोचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:56+5:302021-02-11T04:22:56+5:30

तळेगाव दिघे : वायरिंगचे शॉर्टसर्किट होत छोट्या टेम्पोला आग लागली. लागलेल्या आगीत संपूर्ण टेम्पो जळाला. या घटनेतून चालक मात्र ...

Thrill of burning tempo in Talegaon Shivara | तळेगाव शिवारात बर्निंग टेम्पोचा थरार

तळेगाव शिवारात बर्निंग टेम्पोचा थरार

तळेगाव दिघे : वायरिंगचे शॉर्टसर्किट होत छोट्या टेम्पोला आग लागली. लागलेल्या आगीत संपूर्ण टेम्पो जळाला. या घटनेतून चालक मात्र बचावला. बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील निळवंडे कॅनॉलनजीक ही घटना घडली. यावेळी ग्रामस्थांनी बर्निंग टेम्पोचा थरार अनुभवला.

कोपरगाव येथून चालक राम ज्ञानेश्वर नागरे (वय ३२, रा. कोपरगाव) हे छोट्या टेम्पोमध्ये (क्रमांक एम.एच.-१७, बी.डी. १५९७ ) मोबाईल टॉवरसाठी ऑईल व डिझेलचे कॅन घेवून तळेगाव दिघे गावाकडे येत होते. दरम्यान, तळेगाव शिवारातील निळवंडे कॅनॉलनजीक आला असता पाठीमागून येणाऱ्या प्रवाशांनी नागरे यांना पाठीमागून टेम्पोला आग लागल्याचे सांगितले. दरम्यान चालक नागरे यांनी सदर छोटा टेम्पो ररस्त्याच्या कडेला घेतला. तोपर्यंत टेम्पोतील ऑईल व डिझेलचे कॅन पेट घेतल्याने भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी व रहिवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबने आग विझविली. मात्र तोपर्यंत छोटा टेम्पो जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. वायरिंगचे शॉर्टसर्किट होत छोट्या टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. या आगीत टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

...

फोटो -१०तळेगाव टेम्पो आग

...

ओळी- तळेगाव दिघे येथील शिवारात आगीत खाक झालेला टेम्पो.

Web Title: Thrill of burning tempo in Talegaon Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.