पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST2021-01-09T04:16:34+5:302021-01-09T04:16:34+5:30

पाचेगाव : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर (क्र.४४) पाचेगाव फाटा येथे ‘द बर्निंग कार’चा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो ...

The thrill of The Burning Car at Pachegaon Fata! | पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार !

पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार !

पाचेगाव : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर (क्र.४४) पाचेगाव फाटा येथे ‘द बर्निंग कार’चा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला.

या घटनेत लाखो रुपयांची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः खाक झाली. कारचालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत.

पवन प्रकाश सदाशिवे (रा. अरिहंत जवाहर कॉलनी, औरंगाबाद) परिवारासह (क्र.एमएच १४ बीएक्स ८७३१) बीएमडब्ल्यू कारमधून शिर्डी येथून नेवासामार्गे औरंगाबादला घरी परतत होते. शुक्रवारी पहाटे नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे आल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. पवन सदाशिवे गाडी चालवीत होते. त्यांना आग लागल्याचे समजताच तत्काळ कारमधील सदस्यांना खाली उतरविले. या घटनेत चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले असून पुढील उपचारासाठी त्यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The thrill of The Burning Car at Pachegaon Fata!