तीन वर्ष झाले, सरकार मला फसवतेय- गांधींच्या समाधीस्थळावरुन हजारे यांचा व्हिडीओ प्रसारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:56 IST2017-10-02T13:56:15+5:302017-10-02T13:56:34+5:30
लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत.

तीन वर्ष झाले, सरकार मला फसवतेय- गांधींच्या समाधीस्थळावरुन हजारे यांचा व्हिडीओ प्रसारीत
अहमदनगर : तीन वर्ष झाली भाजप सरकार सत्तेत येऊऩ पण त्यांनी भ्रष्टाचार संपविण्यासाठी एकही निर्णय घेतला नाही. लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. म्हणून मी गांधीजींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करीत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टीका केली.
दिल्ली येथील राजघाटावर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर हजारे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे़ त्यात ते म्हणतात, काँगे्रसने संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकपाल कायदा संमत केला़ त्यावेळी भाजप विरोधात होते़ आता तुम्ही सत्तेत आहाता़ त्याला तीन वर्ष झाली़ मी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पण अद्याप लोकपालचे स्वप्न सत्यात उतरले नाही़ तीन वर्ष झाले तुम्ही सत्तेत येऊन, मी प्रयत्न करतोय, पण तुम्ही प्रतिसाद देत नाहीत़ तुम्ही पंतप्रधान झाले त्यावेळी संसदेच्या पायºयांवर माथा टेकवून या पवित्र मंदिराचे पावित्र्य राखण्याचे घोषित केले होते़ पण आता तीन वर्षांनंतरही लोकपाल, लोकआयुक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही़ संसदेत तुम्ही लोकपाल कायदा अंमलात आणण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ वर्ग एक, दोन, तीन व चार गटातील अधिकारी, कर्मचारी लोकपाल, लोकआयुक्तांच्या अंमलात आणण्याचे तुम्ही आश्वासन दिले होते़ पण ते वचन तुम्ही पाळले नाही़ श्रीरामचंद्र म्हणतात, प्राण जाए पर वचन ना जाए़ पण तुम्ही तर वचनच मोडून काढीत आहात़ तर मग आम्ही का राम म्हणायचे, असा सवाल हजारे यांनी उपस्थित केला आहे़
तुम्ही फक्त जनतेला संकल्प करण्याचे आदेश देत आहेत़ जनतेने संकल्प करुन काय होणार आहे? जनतेला अधिकार मिळायला हवेत़ देशात सध्या जी परिस्थिती आहेत, ती सहन होत नाही़ म्हणून मीच आत्मक्ल्लेश करीत आहे़ शेतकरी सुखी व्हावा, असे गांधींजीचे स्वप्न होते़ पण शेतकºयांचे आज खूप हाल होत आहेत़ शेतकºयांच्या जीवावर व्यापारी श्रीमंत झाले आहेत़ सरकार स्वामीनाथन आयोगाबाबत निर्णय घेत नाही़ त्यांच्या दप्तरात स्वामीनाथन आयोगाची फाईल बंद झाली आहे, अशा शब्दात हजारे यांनी सरकारवर टीका केली.