तीन वर्षांपासून फरार आरोपीला अहमदनगरमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:08 IST2018-04-05T18:06:07+5:302018-04-05T18:08:32+5:30
चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी जेरबंद केले.

तीन वर्षांपासून फरार आरोपीला अहमदनगरमध्ये अटक
अहमदनगर : चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी जेरबंद केले.
गोरख भाऊसाहेब तांदळे (वय २५ , रा. पाईपलाईन रोड) असे आरोपीचे नाव आहे. तांदळे याच्यावर भादंवि कलम ३७९ प्रमाणे मार्च २०१६ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता. परंतु तेव्हापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुरूवारी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आरोपी तांदळे हा अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील भिस्तबाग चौकात येणार होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांच्या सूचनेवरून योगेश गोसावी, उमेश खेडकर, संदीप पवार, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, राहुल हुसळे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे या पथकाने सापळा रचून आरोपी तांदळे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.