तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: September 19, 2014 23:38 IST2014-09-19T23:36:20+5:302014-09-19T23:38:59+5:30
अहमदनगर : पुणे रोडवरील प्रकाश आणि मीनाक्षी रोडे खून प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर : पुणे रोडवरील प्रकाश आणि मीनाक्षी रोडे खून प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून अद्याप कोणतेही धागे-दोरे हाती आले नाहीत.
विनायकनगरमध्ये राहणारे प्रकाश आणि मीनाक्षी रोडे या पती-पत्नीचा बुधवारी मध्यरात्री खून झाला होता. तो गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आला. चोरीच्या उद्देशानेच खून झाला असण्याची शक्यता सुरवातीला पोलिसांनी व्यक्त केली आहे. रोडे हे एल अॅण्ड टीमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला होते. त्यावेळी कंपनीमधून काही साहित्य चोरीला गेले होते. त्यावेळी त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच त्यातील आरोपींनी खून केला असण्याची शक्यता व्यक्त झाली होती. त्यामुळे त्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, मात्र त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. रोडे यांची एक दुचाकी चोरी गेल्याने दुचाकी चोरीतील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मात्र चौकशीअंती रोडे यांची दुचाकी कंपनीच्या पार्किंगमध्येच आढळून आल्याने तीही शक्यता मावळली आहे. दरम्यान विनायकनगरमधील तीन चारचाकी वाहने चोरीला गेले आहेत. त्याचा आणि खुनाचा काही संबंध आहे काय? याचाही पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)