अहमदनगरमधील लष्करी हद्दित घुसखोरी करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:13 IST2019-01-04T17:12:46+5:302019-01-04T17:13:33+5:30
अहमदनगरमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगरमधील लष्करी हद्दित घुसखोरी करणारे तिघे अटकेत
अहमदनगर : अहमदनगरमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोघे उत्तर प्रदेशचे तर एक पारनेर तालुक्यातील आहे. तिघांकडे बनावट कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
प्रदीप सीताराम शिंदे (डिकसळ, पारनेर), रिझवान एजाज अली व सोनू नायजुद्दीन चौधरी (मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही गुरुवारी दुपारी संशयितरित्या नगरच्या लष्करी हद्दित फिरताना आढळले. यावेळी लष्करी जवानांनी त्यांना पकडले. शिंदे याच्या अंगावर लष्करी ड्रेस व बनावट कागदपत्रे होती. तिघांनाही भिंगार कम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.