रस्तालूट करणा-या तिघा दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:58 IST2019-09-06T15:58:00+5:302019-09-06T15:58:36+5:30
नेवासा तालुक्यातील देवगाव ते चांदा रोडवर चाकुने प्राणघातक हल्ला करून पैसे लुटणा-या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी इमामपूर परिसरातून अटक केली़

रस्तालूट करणा-या तिघा दरोडेखोरांना अटक
अहमदनगर: नेवासा तालुक्यातील देवगाव ते चांदा रोडवर चाकुने प्राणघातक हल्ला करून पैसे लुटणा-या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी इमामपूर परिसरातून अटक केली़
जुनेद सत्तार शेख (वय १९ रा़ देवगाव), अशोक उर्फ राम राजू वाघ (रा़ शहापूर) व शाहिद दादाभाई सय्यद (वय २२ रा़ देवगाव) असे अटक केलेल्या तिघांची नावे असून, यांचे साथीदार सद्दाम जोरुद्दीन शेख व बाल्या निकम हे फरार आहेत़ या पाच जणांनी २९ आॅगस्ट रोजी चांदा-देवगाव रोडवर फत्तेपूर शिवारात जयेश भरत पतंगे (रा़ तपोवन रोड, नगर) यांच्यासह किरण कराळे यांना अडवून पतंगे यांच्यावर चाकुने हल्ला केला होता़ तसेच त्यांच्याकडील पैसे, मोबाईल घेऊन पसार झाले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक गणेशइ इंगळे, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागीनाथ पंचमुखी, रविंद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, योगेश सातपुते, संदिप दरंदले, बबन बेरड, सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली़