वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण

By रोहित टेके | Updated: May 10, 2023 11:49 IST2023-05-10T11:48:10+5:302023-05-10T11:49:25+5:30

कोपरगाव शहरातील घटना, पोलिसात गुन्हा

Three people were beaten up by five people due to a dispute over the division of ancestral house | वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण

वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण

कोपरगाव (जि. अहमदनगर ) : वडीलोपार्जीत  घाराच्या वाटणीच्या वादातून पाच जणांनी मिळून तिघांना लाकडी दांड्याने डोक्यात, पाठीत, हातावर मारहाण करून जबर जखमी करून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना कोपरगाव शहरातील टाकळी नाका परिसरात सोमवारी घडली. याप्रकरणी विकास मनोहर विघे (वय ५०, रा. टाकळीनाका, कोपरगाव ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल गोरख विघे, प्रफुल्ल गोरख विघे, विशाल गोरख विघे, संगिता राजेद्र विघे, आलका गोरख विघे (सर्व रा..टाकळीनाका कोपरगाव ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी(दि.९) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीत फिर्यादीसह अनिकेत विकास विघे, भामाबाई मनोहर विघे हे तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तीकोने करीत आहेत.

Web Title: Three people were beaten up by five people due to a dispute over the division of ancestral house