नगरमधील अपघतात तीन ठार, १४ जखमी
By अण्णा नवथर | Updated: March 29, 2023 13:58 IST2023-03-29T13:57:31+5:302023-03-29T13:58:09+5:30
जखमींवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगरमधील अपघतात तीन ठार, १४ जखमी
अहमदनगर: नगरबायपासवरून विळदघाटाकडून कल्याण रोडकडे जाणाऱ्या पिकअपला धडक बसून झालेल्या अपघातात तीन ठार, तर १४ जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झाला. जखमींवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब नामदेव जठार व महेश खरात, यासह आणखी एक, असे तिघेजण जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नगर बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. विळदघाट येथून कल्याण रोडच्या दिशेने चालकासह १७ जण पिकअपमधून जात होते. समोरून द्राक्षे घेऊन आलेल्या आयशरची पिकअपला धडक बसली. त्यामुळे हा पिक मागे आला. दरम्यान पिकअपच्या पाठीमागे असलेल्या ट्रकची पिकअपला जोराची धडक बसल्याने पिकअप दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी मदत कार्य सुरू केले. जखमींना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आणखी दोघांची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"