संगमनेरात तीन कोरोनाबाधीत महिलांचा मृत्यू; नगर जिल्ह्यात मृतांची संख्या अकरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:45 IST2020-06-09T16:37:26+5:302020-06-09T16:45:30+5:30
तीन कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.

संगमनेरात तीन कोरोनाबाधीत महिलांचा मृत्यू; नगर जिल्ह्यात मृतांची संख्या अकरावर
अहमदनगर : तीन कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
मृत्यू पावलेल्या तीन पैकी एक महिला ६ जून रोजी कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. संगमनेरातील मोमीनपुरा येथील ६५ वर्षीय महिला, नायक वाडपुरा येथील ६३ वर्षीय महिला आणि शेडगाव येथील ६३ वर्षीय महिलेचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिनही महिलांना ५ जून रोजी जिल्हा रुग्णालयात आणले होते. तेथेच त्यांच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल ६ जून रोजी मिळाला होता. त्यामध्ये त्या कोरोनाबाधीत आढळल्या होत्या.
नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मंगळवारी (दि.९ जून) संगमनेर तालुक्यात आणखी पाच जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.