श्रीगोंदा तालुक्यात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले; येळपणे गाव सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:16 IST2020-06-27T15:15:35+5:302020-06-27T15:16:13+5:30
भिवंडीवरून येळपणे (ता.श्रीगोंदा) येथे आलेले दोन पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवारी (२७ जून) येळपणे गाव सील केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले; येळपणे गाव सील
श्रीगोंदा : भिवंडीवरून येळपणे (ता.श्रीगोंदा) येथे आलेले दोन पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवारी (२७ जून) येळपणे गाव सील केले आहे.
श्रीगोंद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतीगृहात कोरोनाबाधित पाच रुग्णावर उपचार आले. त्याच ठिकाणी येळपणेचे तीन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे आता आठ रुग्ण झाले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नागरिकांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षीत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.