राहाता तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ३० जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:36 IST2020-06-27T17:36:57+5:302020-06-27T17:36:57+5:30

राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे दोन तर कोल्हार येथे एक जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. चंद्रापूर येथील २३ जणांना तर कोल्हार येथील सात जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे.

Three corona positive were found in Rahata taluka; 30 quarantine | राहाता तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ३० जण क्वारंटाईन

राहाता तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ३० जण क्वारंटाईन

लोणी : राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे दोन तर कोल्हार येथे एक जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. चंद्रापूर येथील २३ जणांना तर कोल्हार येथील सात जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे.

चंद्रापूर गावातील एका कुटुंबातील २५ वर्षीय तरूण गुरूवारी (२५ जून ) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर प्रशासनाने या गावातील काही भाग सील केला आहे. या तरूणांच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या आठ जणाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यात तरूणाच्या ४५ वर्षीय आईची आणि २१ वर्षीय बहिणीची कोरोना तपासणी शनिवारी (२७ जून) पॉझिटिव्ह आली. प्रशासनाने चंद्रापूर गाव पूर्णत: सील करीत या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना आता खबरदारी म्हणून विलगीकरण कक्षात पाठविले आहे.

कोल्हार येथेही शनिवारी एक ५५ वर्षीय व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सदर बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सहा व एक दुकानातील कामगार यांना पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: Three corona positive were found in Rahata taluka; 30 quarantine