पाथर्डीतील शिरापूर येथील छावणीत वीज पडून तीन जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 11:39 IST2019-06-08T11:38:53+5:302019-06-08T11:39:36+5:30

तालुक्यातील शिरपूर येथे काल रात्री उशिरा वादळी व मेघगर्जनेसह झालेल्या पावसांच्या सरीत शिवतेज प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीज पडल्याने ३ गाया जागीच ठार झाल्या आहेत.

 Three cattle killed in a camp in Shirdapur in Pathardi | पाथर्डीतील शिरापूर येथील छावणीत वीज पडून तीन जनावरे ठार

पाथर्डीतील शिरापूर येथील छावणीत वीज पडून तीन जनावरे ठार

पाथर्डी : तालुक्यातील शिरपूर येथे काल रात्री उशिरा वादळी व मेघगर्जनेसह झालेल्या पावसांच्या सरीत शिवतेज प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीज पडल्याने ३ गाया जागीच ठार झाल्या आहेत.

काल रात्री पाथर्डी तालुक्यात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह पाऊसाच्या सरी कोसळल्या यावेळी अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर शिरपूर येथील चारा छावणीत आश्रयाला असलेले शेतकरी मीराबाई सुभाष फुंदे यांच्या २ गाया व सुभाष लक्ष्मण फुंदे यांच्या मालकीची १ गाया अशा अंदाजे दोन लाख रुपये किमतीच्या एकूण ३ गाया वीज पडून जागीच ठार झाले आहेत. वीज पडल्याने विजेच्या कडकडाटाचा मोठा आवाज झाल्याने छावणीतील खुंटीला बांधलेल्या जनावरांनी दोर तोडून सैरावैरा पळ काढला. वीज गेल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी घटना ठिकाणी भेट देवून ठार झालेल्या गायांचा शवविच्छेदन केले आहे.

Web Title:  Three cattle killed in a camp in Shirdapur in Pathardi