टेम्पोच्या धडकेने चार ऊस तोडणी मजुरांसह तीन बैल जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:33 IST2020-12-15T12:33:08+5:302020-12-15T12:33:46+5:30

भरधाव वेगाने जाणार्या टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चार ऊस तोडणी मजूर व तीन बैल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नगर-दौंड रोडवरील ढोकराई फाट्याजवळ मंगळवारी पहाटे घडली.

Three bulls, including four cane harvesters, were injured in the tempo collision | टेम्पोच्या धडकेने चार ऊस तोडणी मजुरांसह तीन बैल जखमी 

टेम्पोच्या धडकेने चार ऊस तोडणी मजुरांसह तीन बैल जखमी 

श्रीगोंदा :  भरधाव वेगाने जाणार्या टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चार ऊस तोडणी मजूर व तीन बैल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नगर-दौंड रोडवरील ढोकराई फाट्याजवळ मंगळवारी पहाटे घडली.

या अपघातात रामदास गोरख महाजन, मनिषा रामदास महाजन, बाबासाहेब नागरगोजे, सुनिता नागरगोजे (रा. खिळद, ता.आष्टी, जि. बीड) व त्यांचे तीन बैल जखमी झाले आहेत.  जखमींवर दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बैलगाड्यांची मोडतोड झाली आहे. 

नागवडे साखर कारखान्यावर बैलगाडी ऊस भरण्यासाठी काष्टीकडे पहाटे जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोने ( क्रमांक एम. एच.-१२, एफ.झेड.५७३६) बैलगाड्यांना जोराची धडक दिली. टेम्पो चालक भास्कर जगन्नाथ ठाकरे (रा.साक्री,  जि. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Web Title: Three bulls, including four cane harvesters, were injured in the tempo collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.